Prakash Jagtap : लाव रे तो व्हिडीओ! यशवंत कारखान्याची २५ एकर कोणाच्या प्रतिज्ञापत्रकामुळे लिलावात गेली, आपण कारखाना मालमत्ता विक्री करुन कुठे हालवायचा निर्णय घेतला होता – प्रकाश जगताप यांचा माधव काळभोर यांच्यावर व्हिडीओ पुरावा देऊन हल्लाबोल…!!


Prakash Jagtap उरुळीकांचन : यशवंत सहकारी साखर कारखान्याची एक इंचही जमीनीची विक्री न करता कारखाना पुन्हा सुरू करणार असल्याची वल्गना माधव काळभोर करत आहे. मात्र दुसरीकडे माधव काळभोर यांच्या प्रतापामुळे तत्कालीन परिस्थितीत बॅंक ऑफ बडोदाच्या साडे नऊ कोटींच्या थकित कर्जापोटी बँककर्ज वसूली प्रकरणात डीआरटी कोर्टात (ऋण वसुली प्राधिकरण ) माधव काळभोर यांनी कै. अशोक काळभोर व के.डी.कांचनयांच्यासह अन्य काही निर्णय प्रक्रियेतील संचालक घेऊन डीआरटी कोर्टात या रक्कमेच्या वसुलीसाठी आम्ही जबाबदार नसल्याचे प्रतिज्ञापत्रक कोर्टात दिले गेल्याने या काही संचालकांमुळेच कारखान्याची २५ एकर जमीन कवडीमोल दरात एका खाजगी माणसाच्या घशात गेली.

एवढेच नाही तर ही मंडळी कारखाना सुरू करणार असल्याचे म्हणत असली तरी या मंडळींनी नवा कारखाना काढायचा,सर्व मालमत्ता विक्री करायची अशी एक नियोजन बध्द कल्पना आखली होती. या सर्व घडामोंडींना हे सर्व प्रमुख संचालक कसे जबाबदार आहेत, हा दाखविणारा तत्कालीन कारखान्याचे प्रशासक बी.जे. देशमुख यांचा व्हिडीओच त्यांनी समोर आणून एक खळबळ उडवून दिली आहे.

यशवंत कारखान्याच्या निवडणुकीत आण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेलचे प्रमुख माधव काळभोर व प्रकाश म्हस्के यांनी सोमवारी (दि.४) केलेल्या आरोपांवर तसेच कारखान्याची सद्य परिस्थिती सभासदांना अवगत व्हावी या दृष्टीने आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीच्या वतीने सोरतापवाडी(ता.हवेली) येथे आयोजित पत्रकार परिषदेत आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे पॅनेल प्रमुख प्रकाश जगताप व प्रशांत काळभोर यांनी पत्रकार परिषद घेऊन तत्कालीन कारखान्याचे प्रशासक बी.जे. देशमुख यांचा व्हिडीओ जारी करुन पुन्हा एकच खळबळ उडवून दिली आहे.

प्रकाश जगताप म्हणाले, माधव काळभोर ही मंडळी कारखाना कोणाच्या काळात बंद पडला ही उत्तरे देत नाहीत? कारखाना कसा आडचणीत आणला याची उत्तरे देत नाहीत? १ लाख साखर विक्रीच्या परवानगी घेऊन साडे चार लाख कोणी विक्री केली ? या प्रश्नांची उत्तरे या मंडळींकडे नाहीत. वैयक्तिक भ्रष्टाचाराचा मात्र ही मंडळी उत्तरे देत आहेत.

साडेतीन हजार गाळप क्षमतेचा कारखाना या महत्त्वाच्या संचालक मंडळातील आपआपसातील जिरवाजिरवीने दिड ते दोन हजार प्रतिदीन क्षमतेने चालून कसा तोट्यात गेला. मशनरीतील मेंटेनन्स खर्चात भ्रष्टाचार केल्याने कारखाना कसा ६ ते ७ साखर उताऱ्यापर्यंत खाली घसरून बंद पडला. या प्रश्नांची माधवराव काळभोर का उत्तरे देत नाहीत? याऊलट कारखान्याची २५ एकर जमीन लिलाव होण्यात ही प्रमुख मंडळी कशी जबाबदार आहे. असा एक व्हिडीओ प्रकाश जगताप यांनी सभासदांपुढे मांडला आहे.

कारखान्याच्या थकीत साडे नऊ कर्जवसुली प्रकरणात कर्जवसुली संचालक मंडळाकडून होणे गरजेचे असताना, डीआरटी कोर्टात सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेत माधव काळभोर, के.डी.कांचन , कै. अशोक काळभोर या मंडळींनी न्यायालयात संचालक या वसुलीस जबाबदार नसल्याचे प्रतिज्ञापत्रक सादर केल्यामुळेच कारखान्याच्या २५ एकर जमिनीची लिलाव प्रक्रिया कारखान्याच्या मालमत्तेतून करण्यात हे संचालक जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. Prakash Jagtap

प्रकाश जगताप पुढे म्हणाले, संचालक मंडळात १ लाख पोती विक्रीची परवानगी घेतली असताना, हे प्रमुख मंडळी कारभार करताना साडेचार लाख पोती कशी विक्री झाली. कारखान्याला एकच गेट आहे मग तुम्ही पोती कशी बाहेर जाऊन दिली. या निर्णयाने ९५० दराने साखरेची विक्री होऊन पुढील चार महिन्यांत साखरेचा बाजार हा २६५० रुपये होऊन या निर्णयाने कारखाना ५७ ते ६० कोटी खड्डय़ात कोणी घातला ?या प्रश्नाचे उत्तरे माधव काळभोर यांनी द्यावीत असे आवाहन त्यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला कारखान्याचे माजी संचालक गोपाळ म्हस्के, हवेली बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, बाजार समितीचे संचालक शशीकांत गायकवाड,लक्ष्मण केसकर, कदमवाकवस्तीचे सरपंच चित्तरंजन गायकवाड, शिंदवणेचे माजी सरपंच आण्णा महाडीक, जितेंद्र बडेकर, संदिप गोते आदी उपस्थित होते.

म्हस्के म्हशीचा धंद्यातून कसे अब्जावधी कसे झाले…!

सिटीझन बँकेच्या आरोपावर खुलासा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश म्हस्के यांच्या आरोपावर प्रकाश जगताप यांनी पलटवार केला आहे. मी हवेली बाजार समितीचा सभापती होण्यापूर्वी आमच्याकडे ५० एकर जमीन होती. आम्ही ट्रॅक्टर,ट्रक व्यवसाय , वाळू लिलाव हे धंदे करुन ही प्रगती केली आहे. माझ्या दुचाकीच्या किकला स्प्रिंग होती का, असे विचारणाऱ्या म्हस्के यांनी माझी गाडी कधी पाहिली, दुसऱ्याच्या घराला काचेचे म्हणणाऱ्या आपणच काचेच्या घरात राहतोय हे आत्मपरीक्षण करावे.

आपण म्हशीचा धंदा करुन अब्जावधी कसा झालात, सिटीझन बँकेच्या बॅकेत आपण काय केले? हे सर्वांना ज्ञात आहे. शरद पवार साहेब यांच्या सलगीत राहून पुणे महानगरपालिका यांच्या मदतीने हॉटेल शांताईची जागा कशी खरेदी केली? जागा खरेदी करताना आकडे किती कमी केले? आपण खरेदी विक्री संघाच्या जागेत बिल्डरकडून किती नफा मिळवून आपले उखळं कसे पांढरे केले हे कोणाला सांगण्याची गरज नाही अशे प्रतिउत्तर प्रकाश जगताप यांनी प्रकाश म्हस्केंवर नाव घेऊन केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!