Prakash Ambedkar : महाविकास आघाडीने भाजपसोबत २० जागा फिक्स केल्या!! प्रकाश आंबेडकरांच्या आरोपाने राजकारणात खळबळ 


Prakash Ambedkar : महाविकास आघाडीने भाजपसोबत लोकसभेच्या २० जागा फिक्स केल्या आहेत. असा गंभीर आरोप वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. कल्याण, बीड, बुलढाणा अशा काही मतदारसंघातील जागांची नावे घेत या जागा फिक्स केल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे. आज चंद्रपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलताना त्यांनी यावर भाष्य केलंय.

ते म्हणाले, आगामी लोकसभेमध्ये ३० टक्के मत हे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मतानुसार मतदान होईल, असा अंदाजही आंबेडकरांनी बोलताना व्यक्त केला आहे. तसेच दोन्ही आघाड्यांना मतदान करू नका, असे मनोज जरांगे यांच्या आवाहनाचा मोठा परिणाम मतांमध्ये होईल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.

मी जर अशा प्रकारचे आरोप केले तर, कल्याणची जागा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासाठी सोडलीय. पंकजा मुंडे यांच्यासाठीची जागा राष्ट्रवादी पक्षाने पाच वेळा निवडणुकीत पराभव झालेला व्यक्तीस उमेदवारी देऊन ती जागा त्यांच्या साठी सोडलीय. अशा अनेक जागा आहेत. याचा नेमका अर्थ काय होतो, याचा विचार केला पाहिजे. Prakash Ambedkar

नवीन कार्यकर्ता, मतदारसंघात नवा उमेदवाराचा चेहरा असताना त्याला डावलून नेहमीच पराभूत झालेल्या उमेदवारांनाच पुन्हा संधी देत आहात, म्हणजे याचा नेमका अर्थ काय, हे लक्षात घेतले पाहजे. अशा वीस मतदारसंघातील नावे मला सांगता येतील, जिथे उमेदवारांची फिक्सिंग झालीय. असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना केला आहे.

पुढे ते म्हणाले की, राज्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा फॅक्टर कुणीही लक्षात घेतलेला नाही. मराठा समाजातील गरीब मराठा वर्ग मनोज जरांगे यांना सर्वेसर्वा मानतोय. माझ्या अंदाजानुसार राज्यातील ३० टक्के मतदान हे जरांगे पाटील यांच्यानुसार मतदान करणार.

त्यामुळे त्यांनी आधीच असे घोषित केले आहे की दोन्ही आघाड्यांना मतदान करायचे नाही. परिणामी, यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मोठी उलथापालथ होईल, असा विश्वासही प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना व्यक्त केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!