भाजपमध्ये जाण्याचा प्रज्ञा सातव यांचा निर्णय दुर्दैवी, यामुळे राजीव सातव यांच्या आत्म्यास दुःख झालं असेल…

मुंबई : काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. स्वर्गीग काँग्रेसचे एकनिष्ठ नेते राजीव सातव यांनी काँग्रेसमध्ये एकनिष्ठ राहून अनेकांना न्याय दिला होता. मात्र आज त्यांच्या पत्नी भाजपात गेल्या. यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. आता आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
रोहित पवार म्हणाले, साखरेच्या सुरीने मित्रपक्षाचा गळा कापण्यात भाजपचा हात कुणीही धरणार नाही. याच अनुषंगाने कळमनुरी मतदारसंघात शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात उभा करण्यासाठी भाजपाने आपल्या निष्ठावंतांना अंगावरील माशी झटकावी तसं बाजूला सारलं आणि आगामी उमेदवार म्हणून प्रज्ञाताईंना पक्षात प्रवेश दिला.
यावरून २०२९ मध्ये मित्रपक्षांना संपवून भाजप स्वबळावर निवडणूक लढेल, हे मी अनेकदा केलेलं भाकित हळूहळू सत्यात उतरताना दिसतंय. अशी जाहीर टीका रोहित पवार यांनी केली आहे. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे 2029 ला नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बाकी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रज्ञाताई सातव यांचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या या निर्णयाने स्व. राजीव जी सातव यांच्या आत्म्यास नक्कीच दुःख झालं असेल. असेही शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. राजीव सातव यांची काँग्रेस पक्षाची निष्ठा होती यामुळे हा निर्णय कोणाला अपेक्षित नव्हता.

