प्रधानमंत्री आवास योजनेतुन आता सामाईक जागेवरही बांधकाम करता येणार…!

पुणे : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालवलेल्या पीएम आवास योजनेंतर्गत, भारतात राहणार्या प्रत्येक नागरिकाला, मग ते शहर असो किंवा गाव, त्यांना कायमस्वरूपी घर मिळवून देण्याची योजना उपलब्ध करून देण्यात आली असून यामध्येच आता जागेची समस्या शहरी भागात मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने लाभार्थ्यांसाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
जागा सामाईक असल्यास अशा पात्र लाभार्थ्यांना आवास योजनेचा लाभ घेणे शक्य व्हावे, यासाठी त्यांना सामाईक जागेवर बहुमजली इमारत बांधण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. एकाच कुटुंबातील परंतु सामाईक जागा असलेल्या लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी भागात बहुमजली इमारत बांधण्यास शासनाने परवानगी दिली आहे, याबाबतचे आदेश गृहनिर्माण विभागाचे कार्यासन अधिकारी राजू अंबाडेकर यांनी काढले आहेत.
दरम्यान ,अशा परिस्थितीत एकत्र कुटुंब पध्दतीमुळे कुटुंबप्रमुखांच्या नावावरच संपूर्ण जागा असल्याने कुटुंबातील इतर पात्र लाभार्थ्यांना नावावर जागा नसल्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे.यासाठी त्यांना सामाईक जागेवर बहुमजली इमारत बांधण्यास राज्य शासनाने हि सेवा राबवली जात आहे.