Pradeep Kand : देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतर प्रदिप कंद घेणार माघार! पक्षात योग्य सन्मान ठेऊ; कार्यकर्त्यांचा न्याय देण्याची ग्वाही…


Pradeep Kand उरुळीकांचन : शिरुर -हवेली विधानसभा निवडणुकीत ‘अपक्ष’ उमेदवारी अर्ज दाखल करुन बंडखोरी करण्याचा निर्धार केलेले भाजप नेते प्रदिप कंद हे आपला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. भाजपचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांनी प्रदिप कंद यांना चांगल्या पदावर संधी देऊन भाजपच्या कार्यकर्त्यांना योग्य न्याय देण्याची ग्वाही दिल्याने प्रदिप कंद यांनी तलवार म्यान केली असून शिरुर-हवेलीच्या मैदानात प्रदिप कंद यांची ही तिसऱ्यांदा माघार ठरली आहे.

भाजपचा पारंपारीक मतदारसंघ असलेल्या शिरुर -हवेली मतदारसंघ महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादीला गेल्याने तीव्र स्पर्धेत असलेल्या प्रदिप कंद यांनी या मतदारसंघात मैत्रीपूर्ण निवडणूक लढविण्याची मनिषा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. पुणे जिल्ह्यात काही मतदारसंघात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचा पार्श्वभूमीवर प्रदिप कंद यांनी वरिष्ठांना मैत्रीपूर्ण लढत करावी म्हणून ते प्रयत्नशील होते.परंतु पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रदिप कंद यांची समजून काढून आपला अर्ज माघारी घेण्णाची सूचना आज दूरध्वनीकरून केल्याने कंद यांनी पक्षाचे महत्त्वाचे सहकारी यांच्याशी चर्चा करुन अर्ज माघारी घेण्याचे निश्चित केले आहे. Pradeep Kand

प्रदिप कंद हे राष्ट्रवादीत असल्यापासून २०१४ पासून विधानसभेला तीव्र इच्छुक आहे. परंतु शेवटच्या टप्प्यात त्यांची उमेदवारीचा पत्ता कट होत असल्याचा इतिहास आहे. परंतु पक्ष निष्ठा पाळीत हे राष्ट्रवादीशी २०१४ ला प्रामाणिक राहिले. परंतु त्यांना २०१९ ला असाच पत्ता कट झाल्याने त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपात राहून कंद यांनी शिरुरची जागा पक्षाला मिळवून निवडणूक लढविण्याचे प्रयत्न करीत होते.

राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी या मतदारसंघात चाचपणी सुरू केल्याने कंद यांनी त्यांनी बाजूला राहण्याची भूमिका घेतली होती. दरम्यानच्या मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झालेल्या निर्णयाने भाजपकडून ठाम असल्याल्या प्रदिप कंद यांच्या प्रयत्नावर पाणी फिरले आहे.प्रदिप कंद यांच्या माघारी निर्णयानंतर शिरुर-हवेलीत भाजपमध्ये फाटाफूट घडणे अटळ आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!