Pradeep Kand : यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या नवनियुक्त संचालकांचा प्रदीप कंद यांच्याकडून सत्कार, मदत करण्याची दिली ग्वाही…


Pradeep Kand : उरुळी कांचन : नुकत्याच पार पडलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालकांनी लोणीकंद येथे प्रदीप कंद यांची सदिच्छा भेट घेतली. या कारखान्याची नुकतीच निवडणूक पार पडली आहे.

यावेळी प्रदीप कंद म्हणाले, कारखाना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतकरी सभासद बंधु भगिनींना मोठ्या विश्वासाने नविन संचालकांना साथ दिली.

हवेली तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या प्रपंचाशी निगडीत असलेल्या स्व. आण्णासाहेब मगर यांच्या अथक परिश्रम व मेहनतीने उभा राहिलेला कारखाना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मदतीसाठी निश्चित पाठपुरावा केला जाईल, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

मी माझ्या वतीने तालुक्यातील सर्व सहकारी व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत यशवंतची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. पण निवडणूक झाली. Pradeep Kand

यामध्ये आपल्याला यश आले नसले तरी आपण सर्वांनी आपल्या तालुक्याची अस्मिता जपण्यासाठी सर्व पक्षीय मतभेद बाजुला सारुन भविष्यात यशवंत चालु करण्यासाठी प्रयत्नशील राहु, असेही यावेळी त्यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!