मुंबईत 17 मुलांना ओलीस ठेवलेल्या रोहित आर्याच्या शवविच्छेदनाला विलंब; डॉक्टर हजर पण कुटुंबीय…

पुणे : पुण्यातील कोथरूड भागातील एका सोसायटीत राहणाऱ्या रोहित आर्याने मुंबईत 17 मुलांना ओलीस ठेवले होते. पोलिसांनी मुलांना सुरक्षित बाहेर काढताना रोहित आर्यावर गोळी झाडली. या प्रकरणात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मृत रोहित आर्याचे शवविच्छेदन करण्यापूर्वी कुटुंबियांशी पोलिसांकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. के. एस. पाटील पोलिस सर्जन, नागपाडा पोलिस रुग्णालयचे डाॅक्टर जेजे रुग्णालयात दाखल झाले आहेत. शवविच्छेदना दरम्यान कुटुंबियांची उपस्थिती महत्वाची असल्याने विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

पवई भागात रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने तब्बल 17 मुलांना ओलीस ठेवले. या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यांनी सर्व मुलांना सुरक्षित बाहेर काढले. या प्रकरणात धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. रोहित आर्याचे मुळ नाव रोहित हारोलीकर अस असल्याचे त्याच्या सोसायटीतील लोक सांगत आहेत. पुण्यातील कोथरूड भागातील तो एका सोसायटीमध्ये आई-वडिलांसोबत राहतो. पोलिसांनी मुलांना सुरक्षित बाहेर काढताना रोहित आर्यावर गोळी झाडली, त्यानंतर जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांकडून या प्रकरणात अजूनही तपास केला जात आहे.

     
   
दरम्यान रोहित आर्याचा मृतदेह जे जे रुग्णालयात आणण्यात आला आहे. थोड्यावेळात शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टरांची टीम येणार असल्याची माहिती आहे.पोलिसांचे पथक जे जे रुग्णालयात दाखल झाले आहे. स्वागृह समोर पोलीस बंदोबस्त आणि रुग्णालय कर्मचारी आले आहेत. रोहित आर्याचे नातेवाईक रूग्णालयात दाखल होण्यास विलंब झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
 
				
