पुण्यात पोस्टर हल्ला! आदित्य ठाकरे यांच्यावर शिदे गटाकडून जोरदार टीका, घराणेशाही अन् मीठी नदी घोटाळ्यावर बोचरी टीका


पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना सोडून भाजपला साथ दिल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर सतत टीका करत आहे. आता शिंदे गटाने यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार करत पुणे शहरात ठिकठिकाणी बोचऱ्या आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

या पोस्टर्समधून घराणेशाही आणि मीठी नदी घोटाळ्यावर अप्रत्यक्ष हल्ला चढवण्यात आला आहे. हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या पोस्टरमध्ये कार्टूनमधून आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली असून त्यावर लिहिले आहे, ही बॅटरी लवकरच डिसचार्ज होणार, कारण ही घराणेशाहीवर चालते.

तसेच दुसऱ्या पोस्टरमध्ये मुंबईतील मीठी नदी घोटाळ्याचा उल्लेख करत लिहिले आहे, मीठी वाजवणार शिटी, मीठी मारणार मगर मिठी, कॉन्ट्रॅक्ट घेणारा ‘दिनो’, आत कुणी जाणार आता फक्त ‘गिनो/,असे म्हणत टीका केली आहे. हे पोस्टर्स ठाकरे गटाच्या टीकेला दिलेला राजकीय प्रत्युत्तर मानले जात आहे.

या पोस्टर्सच्या माध्यमातून शिंदे गटाने ठाकरे गटावर जोरदार टीका केली असून मीठी नदी प्रकरण आणि घराणेशाहीच्या मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जुबली अधिक तीव्र झाली आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. यामुळे येणाऱ्या काळात ठाकरे गट नेमकं काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!