Poshan Aahar : पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहारात किडे, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा खेळखंडोबा…


Poshan Aahar : पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय पोषण आहाराच्या धान्याला किड लागल्याचा प्रकार समोर आला आहे. शालेय विद्यार्थ्यांना शाळेसोबत शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरु करण्यात आली आहे.

मात्र या योजनेसाठी पुरवठा केला जाणार आहारातील माल निकृष्ठ दर्जाचा पुरवठा होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असुन यातुन नक्की पोषण कुणाचे केलं जातय असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

दरम्यान, खेड तालुक्यातील बहुळ येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या तांदुळ आणि मटकी, मुगडाळ, डाळींना किडे आळ्यांनी घेरले आहे. Poshan Aahar

यावेळी बहुळ ग्रामस्थांसह जिल्हा परिषद सदस्यांनी शाळेत येऊन पाहणी देखील केली. या घटनेने नंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या आरोग्य धोक्यात असल्याचे दिसून आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!