Pooja Khedkar : पूजा खेडकर अजूनच अडकणार! पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी घेतला मोठा निर्णय…


Pooja Khedkar : पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पुजा खेडकरवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे. तसेच पूजा खेडकरनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. तशी तक्रार पुजा खेडकरनी पोलिसांना दिली आहे आणि यूपीएससीकडे देखील तशी तक्रार केली होती.

पुणे जिल्ह्याधिकारी कार्यालयात प्रशिक्षण कालावधीत सुहास दिवसेंनी लैंगिक छळ केल्याचा पुजा खेडकरचा आरोप आहे. दरम्यान या आरोपांबाबत चौकशी करणाऱ्या पुणे पोलिसांनी तीन वेळा समन्स बजवून देखील पूजा खेडकर हजर झालेली नाही.

पूजा खेडकरनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवस यांच्यावर छेडछाडीचा आरोप केला होता. पूजा खेडकरने पुण्याचे जिल्हाधिकारी दिवसे यांच्या विरोधात वाशिम पोलिसात तक्रार दाखल केली. दिवसे यांनी लैगिंक आणि मानसिक छळ केल्याचे पूजा खेडकरनी आरोप केले होते. ⁠Pooja Khedkar

वाशिम पोलिसांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा खेडकरची तक्रार नोंदवून घेतली. मात्र दिवसे यांच्याविरोधातील तक्रार वाशिम पोलीसांच्या कार्यकक्षेत येत नसल्याने ही तक्रार पुणे पोलीसांकडे वर्ग करण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी पूजा खेडकरला या तक्रारीसंदर्भात काही चौकशीसाठी तब्बल तीन वेळा समन्स पाठवून देखील ती गैरहजर राहिली होती.

जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरुद्ध छळवणुकीची तक्रार प्रकरणात प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर तीनदा समन्स बजावूनही पुणे पोलिसांसमोर हजर झाली नाही. पूजा खेडकरनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरुद्ध वाशिममध्ये छळवणुकीची तक्रार दिली होती.

त्या अनुषंगाने खेडकरला पुणे पोलिसांकडे जबाब नोंदविण्याचे आदेश देण्यात आले होते. पुणे पोलिसांनी तिला दोनदा समन्स बजाविले होते. त्यावेळी खेडकरनी पोलिसांकडे काही अवधी मागितला होता. आठवडाभरानंतर पूजा खेडकर पोलिसांसमोर हजर झाली नाही. जबाब नोंदविण्यास उपस्थित रहावे, असे समन्स पोलिसांनी तिला पुन्हा बजावण्यात आले होते.

दरम्यान तीनदा समन्स बजावूनही ती हजर झाली नाही. खेडेकरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तिचा मोबाइल क्रमांक संपर्क क्षेत्राबाहेर असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर आता दिल्ली पोलिस देखील पूजा खेडकरचा शोध घेत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!