Pooja Khedkar : पूजा खेडकरवर आता कारवाई होणार, म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपली, UPSC आता काय कारवाई करणार?


Pooja Khedkar : पूजा खेडकरचे पाय आणखी खोलात जाताना दिसत आहेत. पूजा खेडकरला डीओपीटीने मसुरी येथील प्रशिक्षण केंद्रात उपस्थित राहण्यासाठी दिलेली मुदत काल (ता.१६) संपली आहे. त्यामुळे आता यापुढे पूजा खेडकरला तिची बाजू मांडण्याची संधी यूपीएससीकडून दिली जाणार नाही.

तशी नोटीस शुक्रवारी (ता.१६) संध्याकाळी पूजा खेडकरच्या पुण्यातील बाणेर रस्त्यावर असलेल्या बंगल्याच्या गेटवर आणि अहमदनगर जिल्ह्यातील भालगाव इथल्या घराच्या दरवाज्यावर डीओपीटीकडून चिकटवण्यात आली होती.

मात्र खेडकरांच्या बंगल्यात राहणाऱ्या व्यक्तींनी ही नोटीस काढून टाकल्याची माहिती आहे. या आधी देखील पुणे पोलिसांनी खेडकर कुटुंबाला वेळोवेळी नोटीस देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, खेडकर कुटुंबाने त्या स्वीकारल्या नाहीत आणि बंगल्याच्या गेटवर त्या चिकटवल्यानंतर त्या काढून टाकल्या होत्या. Pooja Khedkar

दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरवर गुन्हा दाखल केला असून २२ ऑगस्ट पर्यंत तिला न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिलं आहे. मात्र, आता यापुढे पूजा खेडकरचे यूपीएससीसमोर बाजू मांडण्याचे मार्ग बंद झाले आहे. त्यानंतर यूपीएससीकडून पूजा खेडकरवर पुढची कारवाई होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!