Pooja Khedkar : पूजा खेडकरची आता दिल्ली हायकोर्टात धाव, नेमकं कारण काय? अटक टळणार?
Pooja Khedkar : भारतीय लोकसेवा आयोगाकडून कारवाई करण्यात आलेल्या पूजा खेडकरने यूपीएससीच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पूजा खेडकरनं यूपीएससीच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
तसेच यूपीएससीनं पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली होती. तसेच, त्यांना शो कॉज नोटीस बजावली होती. युपीएससीच्या याच निर्णयाविरोधात पूजा खेडकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
यूपीएससीनं पूजा खेडकरला दोषी ठरवले असून UPSC ने पूजा मनोरमा दिलीप खेडकरची उमेदवारी रद्द केली. तसेच, यूपीएससीने भविष्यातील सर्व परीक्षा /निवडींमधून पूजा खेडकरला कायमचं काढून टाकले. पूजा खेडकरला ३० जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यांचं उत्तर न मिळाल्याने यूपीएससीनं ही कारवाई केली आहे. Pooja Khedkar
पूजा खेडकरवर यूपीएससीनं कारवाई केल्यानंतर आता पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. पूजा खेडकरने यूपीएससीमध्ये खोटे दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यूपीएससीनं आता पूजा खेडकरचं पद काढून घेतले असून त्यांना भविष्यात कोणतीही परीक्षा देण्यात येणार नाही.