Pooja Khedkar : नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कसं मिळवलं? आता पूजा खेडकरच्या वडिलांची होणार चौकशी….


Pooja Khedkar : वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा धक्का बसला आहे. राज्य सरकारने पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण थांबवले आहे.

अशातच आता पूजा खेडकर यांनी सादर केलेल्या नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रावरून आता त्यांचे वडील दिलीप खेडकर यांचे उत्पन्न कोटींमध्ये असतानाही त्यांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले? असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर याबाबत चौकशी होणार आहे. अशी माहिती समोर आली आहे.

पूजा खेडकर यांनी पुण्यातील काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून एनटी ३ या संवर्गातून प्रवेश मिळवला होता. त्यावेळी त्यांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रही जोडल्याचे स्पष्ट झाले होते. वास्तविक, दिलीप खेडकर हे त्यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात अधिकारी होते. त्यामुळे २००७ मध्ये त्यांचे उत्पन्न ४ लाखांपेक्षा कमी कसे असेल, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

तसेच त्यानंतर पूजा खेडकर यांनी २०२३ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ओबीसी संवर्गातून तसेच दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून आयएएसची श्रेणी मिळवली होती. त्यासाठी त्यांनी पुन्हा नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडले होते. Pooja Khedkar

दरम्यान, त्यानंतर एका वर्षातच अर्थात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिलीप खेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ४० कोटी रुपये संपत्ती असल्याचे जाहीर केले होते.

त्यामुळे पूजा यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले? हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. याच अनुषंगाने आता प्राप्तिकर विभागाने दिलीप खेडकर यांनी सादर केलेल्या प्राप्तिकर परताव्यावरून त्यांची चौकशी केली जाणार अशी माहिती समोर आली आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!