Pooja Khedkar : मोठी बातमी! पूजा खेडकर दोषी, अखेर उमेदवारी रद्द, परीक्षेलाही बसता येणार नाही, युपीएससीची कारवाई…

Pooja Khedkar : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना अखेर दोषी ठरवण्यात आलं आहे. युपीएससीनेपूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आणि त्यांना भविष्यातील सर्व परीक्षा/निवडींमधून कायमचे काढून टाकण्यात आले आहे.
युपीएससीने तिला दोषी ठरवलं नसल्याचा मुद्दा बचाव पक्षाने मांडला होता. त्यानंतर युपीएससीने दुपारपर्यंत तिला म्हणणं मांडण्यास वेळ दिला होता. पण तिने काहीच प्रतिसाद न दिल्यानं आणि तिचे रेकॉर्ड तपासल्यानंतर पूजा खेडकरवर कारवाई केली आहे.
पूजा खेडकर यांना ३० जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यांचे उत्तर न मिळाल्याने यूपीएससीने ही कारवाई केली आहे. पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससीने कारवाई केल्यानंतर आता पोलिस त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे.
पूजा खेडकरांनी यूपीएससीमध्ये खोटे दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यूपीएससीने आता पूजा खेडकर यांचे पद काढून घेतले असून त्यांना भविष्यात कोणतीही परीक्षा देण्यात येणार नाही. Pooja Khedkar
दिव्यांग प्रमाणपत्र आणि मर्यादेपेक्षा जास्त वेळा युपीएससी परीक्षा देण्यासाठी नावात बदल करण्यात आल्याचे तिच्यावर आरोप होते. पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली.
या सुनावणीत सरकारी वकिलांनी पूजाने कायम त्यांची भूमिका बदलली असून त्यांची कोठडीत चौकशी करण्याची गरज असल्याचा युक्तिवाद केला. न्यायालयाने यावर युपीएससीकडे रेकॉर्ड असल्याचे म्हंटले. तर युपीएससीने पूजाने पूर्ण व्यवस्थेसोबतच फ्रॉड केले असल्याचा धक्कादायक खुलासा न्यायालयात केला आहे.