Pooja Khedkar : मोठी बातमी! पूजा खेडकर आणि कुटुंबीयांना धक्का, झाली मोठी कारवाई…


Pooja Khedkar : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि कुटुंबीयांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. पूजा खेडकर यांच्याशी संबधित असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कंपनीचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील एमआयडीसी परिसरात पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावे ही कंपनी आहे. मनोरमा खेडकर यांच्या नावे असलेल्या थर्मोव्हेरिटा इंजीनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने महानगरपालिकेचा लाखोंचा कर थकवला आहे. त्यामुळे, ही कंपनी कर संकलन विभागाकडून सील करण्यात आली होती. Pooja Khedkar

आता मात्र थकीत कर निर्धारित वेळेत न भरल्यास ही कंपनी लिलावत काढली जाणार आहे. लवकरच लिलाव प्रक्रियेला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती कर संकलन विभागाचे प्रमुख निलेश देशमुख यांनी दिली आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरातील अशाच पद्धतीने कर बुडविणाऱ्या इतर सुमारे 80 मालमत्तांचा देखील लिलाव केला जाणार आहे. देशमुख यांनी याबद्दलही माहिती दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!