Pooja Khedkar : पूजा खेडकरची न्यायालयाकडे मोठी मागणी! आता प्रतिज्ञापत्रात नवीच माहिती, नेमकं काय घडलं?


Pooja Khedkar : पूजा खेडकर यांच्यावर युपीएससीकडून देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात आता पूजा खेडकर यांनी यूपीएससीच्या अपात्रतेला आव्हान दिलं आहे.

पूजा खेडकर यांनी दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नवीन माहिती सादर केली आहे. १२ वेळा युपीएससी परीक्षा दिली असली तरी केवळ दिव्यांग कॅटगरीत दिलेली परीक्षा गृहीत धरावी अशी विनंती पूजा खेडकर यांनी कोर्टात केली आहे. शिवाय नाव आणि आडनावात बदल केला नसल्याचा दावाही पूजा खेडकर यांनी केला आहे. Pooja Khedkar

प्रतिज्ञापत्रात पूजा खेडकर यांनी काय सांगितलं?

पूजा खेडकर यांनी एकूण १२ वेळा परीक्षा दिली आहे. त्यापैकी पाच वेळा दिव्यांग कॅटगरीतून परीक्षा दिली. त्यामुळे बाकीचे ७ वेळा दिलेल्या परीक्षा गृहीत धरू नये, अशी विनंती पूजा खेडकर यांनी दिल्ली हायकोर्टाकडे केली आहे.

मला सर्वच विभागांनी रितसर प्रमाणपत्र दिले आहेत. नाव आणि आडनाव बदलले नाही. तर फक्त मधले नाव बदलले आहे. त्यामुळे नावात मोठा फेरफार केला यात तथ्य नाही. असं पूजा खेडकर यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!