Politics News : राजकारणात मोठा भूकंप होणार? विश्वास बसणार नाही असे नेते भाजपमध्ये येणार, मोठ्या राजकीय हालचाली..
Politics News : सध्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. काल केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सकाळी सकाळीच महाविकास आघाडीला हा मोठ्या राजकीय भूकंपाचा धक्का बसलेला असतानाच भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आणखी नव्या भूकंपाचे संकेत दिले आहेत.
फक्त १५ दिवस थांबा राज्यात आणखी प्रचंड मोठे भूकंप होणार आहेत. तुम्हाला वाटणारही नाही, असे नेते भाजपमध्ये येणार आहेत, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. Politics News
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे संकेत दिले आहेत. महाजन म्हणाले, मी तुम्हाला सांगितलं होतं की राजकारणात मोठे भूकंप होतील. त्याप्रमाणे काँग्रेसचे मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पुढे अजूनही मोठे भूकंप होणार असे वक्तव्य भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
दरम्यान, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच महायुतीच्या भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गट या तीनही पक्षांचा एकत्रितरित्या मेळावा पार पडला. आगामी निडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगावातील श्रीकृष्ण लॉनमध्ये हा मेळावा पार पडला.
या मेळाव्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे मंत्री गिरीश महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील या तिघांची उपस्थिती होती. यावेळी गिरीश महाजन यांनी हे संकेत दिले आहे.