Politics News : पुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला मोठा धक्का! पुतण्याने सोडली साथ, थेट ठाकरे गटात केला प्रवेश…

Politics News पुणे : सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्यात गेल्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी फूट पडली आणि राज्यात काका आणि पुतण्यामध्ये संघर्ष पाहायला मिळत आहेत. अशातच आता राष्ट्रवादीच्या आणखी एका एका काका पुतण्यामध्ये संघर्ष सुरु झाला आहे.

अशातच खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे पुतणे शैलेश मोहिते यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर दिलीप मोहिते पाटील यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. Politics News

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे आज मावळ तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी तळेगाव दाभाडे येथे शैलेश मोहिते यांनी पक्षात प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे निकटवर्तीय आणि माजी महापौर संजोग वाघेरे यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला.

त्यानंतर अजित पवार गटाला जणू काही गळतीचं लागली आहे, असे बोलले जात आहे. कारण वाघेरे यांच्या ठाकरे गटातील पक्ष प्रवेशानंतर अनेकजण अजित पवारांची साथ सोडत आहेत. ही अजित पवारांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. यामुळे राजकारणात पुन्हा एकच खळबळ सुरू आहे.
