Politics News : भाजपला पुन्हा एक मोठा धक्का!! बडा नेता सुनेसह करणार काँग्रेसमध्ये प्रवेश…


Politics News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होणार आहे. सध्या या दोन्ही घटक पक्षांच्या बैठका पार पडताना दिसत आहेत.

माजी खासदार आणि भाजप नेते भास्कर पाटील खतगावकर हे आज त्यांच्या सून मीनल खतगावकर यांच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी तीन वाजता मुंबईतील काँग्रेस कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

खतगावकर हे भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांचे मेव्हणे आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेनीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये खतगावकर यांचा आज काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. Politics News

काही दिवसांपूर्वीच खतगावकर यांनी नांदेडमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. ते आज आपल्या सुनेसह काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. भास्कर पाटील खतगावकर यांच्या सून मीनल खतगावकर या नायगाव विधानसभा मतदारसंघासाठी इच्छूक आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!