राजकारण लैय वंगाळ अन् क्रूर, सरपंच होण्याची इच्छा, लाडक्या लेकीचा अडथळा; नराधम बापाने पोटच्या पोरीला संपवलं…


नांदेड : राजकारणाची हाव माणसाला कोणत्या थराला नेऊ शकते, याचा एक हृदयद्रावक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. सरपंच होण्यासाठी पित्याने आपल्या पोटच्या ७ वर्षाच्या लेकीची हत्या केल्याची भयंकर घटना महाराष्ट्रातील नांदेडमध्ये घडली आहे.

पांडुरंग कोंडामंगले असं या निर्दयी पित्याचे नाव आहे. त्याने आपल्या सात वर्षाच्या मुलीला तेलंगणा राज्यातील एका कॅनोलमध्ये फेकले, ज्यामध्ये तिचा दुर्दैवी अंत झाला. बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

नांदेडमधील केरूर गावातील रहिवासी २८ वर्षीय पांडुरंग कोंडमंगळे हे त्यांच्या गावात एक सलून चालवतात. त्यांना दोन जुळ्या मुली (वय,७ वर्ष) आणि एक मुलगा (वय, ३) अशी तीन अपत्ये होती. पांडुरंगला आपण गावचे सरपंच व्हावे, ग्रामपंचायत निवडणूक लढवावी अशी इच्छा होती.

मात्र महाराष्ट्र पंचायत राज कायदा ) त्याच्या या स्वप्नातील मोठा अडथळा ठरला. या कायद्यानुसार, दोनपेक्षा जास्त मुले असलेली व्यक्ती पंचायत निवडणूक लढवू शकत नाही.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पांडुरंगने सध्याचे गावचे सरपंच गणेश शिंदे यांच्याशी चर्चा केली. सुरुवातीला त्यांनी मुलीला सोडून देण्याचा किंवा दत्तक घेण्याचा विचार केला होता, परंतु जन्म प्रमाणपत्रावर तिचे नाव नोंदल्यामुळे हा पर्याय कायदेशीरदृष्ट्या धोकादायक वाटत होता. शेवटी, त्यांनी निष्पाप मुलीला संपवण्याचा एक भयानक कट रचला.

या योजनेनुसार, पांडुरंग त्याच्या मुलीला त्यांच्या दुचाकीवरून तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील निजामसागर कालव्यात घेऊन गेला. तिथे त्याने त्याच्या स्वतःच्या लाडक्या मुलीला थंड कालव्यात ढकलले. जवळच्या शेतात काम करणाऱ्या लोकांना काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि ते आले तेव्हा त्यांना मुलीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला.

माहिती मिळताच निजामाबाद पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि त्याचे फोटो सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसारित केले. एका गावकऱ्याने छायाचित्रातून मुलीची ओळख पटवली आणि ताबडतोब पोलिसांना कळवले. जेव्हा पोलिस आरोपी पांडुरंगकडे पोहोचले तेव्हा त्याने सुरुवातीला मुलीवर उपचार करण्यासाठी बाहेर गेलो असल्याचा कारण दिले. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला अन् त्याने गुन्हा कबूल केला.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी पांडुरंग कोंडमंगळे आणि कटात सहभागी असलेले सरपंच गणेश शिंदे यांच्याविरुद्ध खून आणि गुन्हेगारी कटाच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!