Politics : पवार कुटूंबावर टीका करणं गोपीचंद पडळकर यांना येणार अंगलट?, न्यायालयीन कारवाई होण्याची शक्यता, नेमकं काय घडलं?


Politics मुंबई : भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका केली होती. अजित पवार हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे.

तर सुप्रिया सुळे लबाड लांडग्याची लेक आहे, अशा आशयाची टीका गोपीचंद पडळकरांनी केली होती. अशी टीका केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर निदर्शने केली होती. Politics

आता बारामती तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी आमदार पडळकर यांना सात दिवसात माफी मागा, अन्यथा न्यायालयीन कारवाईस तयार राहा अशा स्वरूपाची कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

पडळकर हे सातत्याने बेताल वक्तव्य करतात व अजित पवार सुप्रिया सुळे यांच्या पवार कुटुंबाचा अपमान करतात त्यातून अनेक नागरिकांच्या भावना दुखावल्या असून त्यांनी निवडणूक आयोगासमोर प्रतिज्ञापत्र ते खोटी माहिती दिली या व अशा कारणांवरून माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी ही नोटीस बजावली आहे.

या संदर्भात नितीन यादव म्हणाले येत्या सात दिवसात गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची लेखी माफी मागावी.

स्वतंत्रपणे लेखी माफी न मागितल्यास आपण आमदार पडळकर यांच्याविरोधात न्यायालयात दिवाणी, फौजदारी व अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यादव यांनी ॲड. असीम सरोदे, ॲड. श्रीया आवले, ॲड. बाळकृष्ण निढाळकर, ॲड. अवंती जायले यांच्यामार्फत ही कायदेशीर नोटीस बजावली असून, सात दिवसात लेखी माफी न मागितल्यास गोपीचंद पडळकर यांना न्यायालयात खेचणार असा इशारा नितीन यादव यांनी नोटिसमधून दिला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी केलेले वक्तव्य..

धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर गोपीचंद पडळकर म्हणाले, धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत.

अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!