Politics : शरद पवार यांच्या स्वाभिमानी नेतृत्वाच्या पाठिशी रहा – जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांचे मत! हवेलीत शरद पवार गटाचा पहिलाच मेळावा..!!


Politics  उरुळीकांचन : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोडून काही नेते भाजपला (BJP) जाऊन मिळाले आहेत. त्यांच ओझ आपल्या डोक्यावर नसून तिकडे गेलेल्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर आहे. स्वाभिमान आपण जपला असून त्यांनी स्वाभिमान विकला असल्याचे मत पुणे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गटाचे) अध्यक्ष जालिंदर जगन्नाथ बापू शेवाळे यांनी व्यक्त केले आहे (Politics)

लोणी काळभोर (Loni Kalbhor) येथे रविवारी (ता.१७) रोजी राष्ट्रवादी( शरद पवार गट )कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी शेवाळे बोलत होते ते पुढे म्हणाले, शरद पवार साहेबांची उंची हिमालय एवढी आहे. पवार साहेबांचा विचार म्हणजे एक सागर आहे. पवार साहेबांचे नेतृत्व सक्षम असून त्यांच्या पाठीमागे आपण जायचे आहे.

सर्व पक्ष एक राहिले तर भाजपचा पराभव नक्की करता येईल व भाजपच्याच्या हातून देशाची सहज आपण घेऊ शकतो. म्हणून निवडणुका कधीही होतील. म्हणून कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे येणाऱ्या काळात आपल्याला कार्यकर्त्यांची संघटना मजबूत करायची आहे. संघटना मजबूत असल्यास विजय नक्कीच मिळेल असे ते म्हणाले.

प्रवक्ते विकास लवांडे म्हणाले, पुणे जिल्हा कायम साहेबांच्या पाठीशी राहणारा असून कार्यकर्त्यांनी दोन दगडावर हात न ठेवता साहेबांना पाठिंबा द्यावा .व शिरूर हवेलीचा विकास आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली कसं होईल याकडे लक्ष द्यावे आपल्याबरोबर जुने सवंगडे असून तरुण सहकारी सुद्धा आहेत.

आ. अशोक पवार म्हणाले,की हवेली तालुक्याने मला भरपूर प्रेम दिले असून निवडणुकांचे नुसते तर्क विर्तक चालू आहेत .परंतु अजून कोणाला कसलाच मार्ग दिसत नाही. लोकसभेची निवडणूक लवकर होण्याची शक्यता असून साहेबांच्या मागे जनतेच्या ओघ चालूच आहे.

मेळाव्यास माधव काळभोर , प्रकाश म्हस्के, महादेव कांचन ,रंगनाथ काळभोर, सोनबा चौधरी, विकास लवांडे, युगंधर काळभोर , माऊली काळभोर ,प्रदीप वसंत कंद, प्रकाश काळभोर , सुर्यकांत गवळी , स्मिता नाँर्टन , भाऊसाहेब कांचन यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय राखपसरे यांनी केले तर आभार अभिमन्यू उपाध्ये यांनी मानले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!