Politics : विधानसभा निवडणुकीच्या तयारीत भाजपची आघाडी, उमेदवारांची पहिली यादी कधी येणार? जाणून घ्या…
Politics : आगामी काळात म्हणजेच साधारण ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती तसेच महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा राजकीय गोंधळ दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत नेत्यांची घोडदौड सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये तयारी जोरात सुरू झाली आहे. दरम्यान, भाजपच्या उमेदवारांच्या यादीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी भाजप आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू शकते. या यादीत भाजप सुमारे ३० ते ४० उमेदवारांची नावे जाहीर करू शकते. Politics
गेल्या निवडणुकीत ज्या जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले होते किंवा अगदी कमी फरकाने विजयी झाले होते, अशा जागांवर भाजप आपल्या पहिल्या यादीतील उमेदवारांची नावे जाहीर करेल, असेही सूत्रांनी सांगितले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजप ज्या जागांवर उमेदवार उभे करणार आहे त्यातही राखीव जागा असतील. खरे तर भाजप हे पहिल्यांदाच करत आहे असे नाही. याआधी पक्षाने गेल्या वर्षी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान निवडणुकीत असा प्रयोग केला होता.