Politics : देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याच्या विनंतीवर अमित शाहांचा मोठा निर्णय, राज्यात राजकीय घडामोडींना वेग, बैठकीत नेमकं काय घडलं?


Politics : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक निकालांनी संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिल्याचं निवडणूक निकालाअंती पाहायला मिळाले आहे.

महायुतीला राज्यात अवघ्या १७ जागा मिळाल्या आहेत, तर महाविकास आघाडीचा ३१ जागांवर विजय झाला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे, महायुतीचे सर्वच नेते निराश झाले असून पुढील विधानसभा निवडणुकांसाठी रणनिती आखण्यासंदर्भात ते बोलत आहेत.

त्यातच, भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महायुतीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली होती. तसेच, वरिष्ठांनी मला सरकारमधून दूर करावे, अशी विनंती मी त्यांच्याकडे करणार आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री पदावरुन आपण दूर होणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. फडणवीसांच्या या विधानानंतर राज्यात चांगलाच गदारोळ माजला.

भाजपच्य नेत्यांनीही फडणवीसांच्या या निर्णयाला विरोध केला होता. आता, दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनी याबाबत थेट आदेशच दिला आहे.

तुमचे काम सुरु ठेवा, शपथविधीनंतर सविस्तर बैठक होईस, असे अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीसांना म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री आणि आज दुपारी अशा दोन वेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. Politics

त्यामुळे, कालची अपूर्ण चर्चा आजच्या दुसर्‍या भेटीत पूर्ण झाल्याचे समजते. फडणवीस यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की, सध्या तुम्ही तुमचे काम सुरु ठेवा.

नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर आपण महाराष्ट्राबाबत सविस्तर चर्चा करुन निर्णय करु. महाराष्ट्रात काय करेक्टिव्ह उपाययोजना केल्या पाहिजेत, याचा आराखडा तयार करू. पण, तोवर तुम्ही आपले काम सुरू ठेवा, असा सल्लाच अमित शाह यांनी फडणवीसांना दिला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मला मोकळे करा, अशी विनंती केल्यानंतर आजच्या अमित शाहांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र, आजच्या बैठकीनंतर फडणवीसांच्या विनंतीवरील निर्णय तुर्तास लांबणीवर पडला असल्याचे दिसत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!