Politics : हम सब साथ साथ है! एकाच फ्रेममध्ये ७९५ खासदार, जुन्या संसदेत सत्ताधारी अन् विरोधकांचं एकत्र फोटोशूट..


Politics नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आजपासून नवीन संसद भवनात अधिवेशनाचे कामकाज सुरू होणार आहे. याआधी जुन्या संसदेत लोकसभा आणि राज्यसभेच्या ७९५ खासदारांचे एकत्र फोटोशूट झाले. Politics

यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, उपराष्ट्रपती जगदीप धनखर, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य एकत्र फोटोशूटसाठी उपस्थित होते.

नव्या संसदेच्या उभारणीच्या वेळी महिला आरक्षण डोळ्यांसमोर ठेवून लोकसभेत ८८८ व राज्यसभेत ३८४ आसनांची तरतूद करण्यात आली होती. भविष्यात दोन्ही सभागृहांच्या सदस्यसंख्येतील वाढीचे संकेत म्हणून याकडे पाहिले जात आहे.

संसदेचे कामकाज आता नव्या इमारतीतून हाेणार आहे. १९२७ मध्ये संसद भवनाचे उद्घाटन झाले हाेते. जुनी इमारत ९० वर्षांपेक्षा जास्त वयाची झाली असली तरी याच इमारतीने देशाच्या स्वातंत्र्याची ७६ वर्षे पाहिली आहेत.

केंद्र सरकार महिलांना लोकसभा व राज्यांच्या विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देणारे ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक नव्या संसदेत लोकसभेमध्ये मांडणार आहे. या विधेयकाला सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!