राजकीय उलथापालथ!उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयावर राज ठाकरेंची नाराजी, तातडीने राऊत शिवतीर्थावर दाखल

चंद्रपूर: गेल्या तीन दिवसापासून राज्यात गाजत असलेल्या चंद्रपूर महापौर निवडीवरून राज्यात खळबळ उडाली आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे नाराज झाले आहेत. त्यांची नाराजी कानावर येताच खासदार संजय राऊत यांनी तातडीने शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंशी चर्चा केली .या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

चंद्रपूर महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मदतीशिवाय ना काँग्रेसची सत्ता येऊ शकते, ना भाजपची. चंद्रपूरच्या सत्तेची चावी ठाकरे सेनेच्या हाती होते. ठाकरे सेना काँग्रेससोबत जाईल, असे एकंदरित संकेत मिळत होते. मात्र यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे नाराज झाले असल्याने खासदार संजय राऊत यांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्या दोघांच्यामध्ये तब्बल एक ते दीड तास चर्चा झाली.
दोघांच्या भेटीमधील चर्चा तपशील समजू शकला नसला तरी.शिवसेनेच्या दुहेरी भूमिकेवर राज ठाकरेंनी बोट ठेवल्याची चर्चा केली जात आहे. आता या वादावर काय तोडगा निघतो, हे पहावे लागणार आहे.

याआधी कल्याण डोंबिवली आणि नाशिकमध्ये मनसेनेच्या स्थानिक नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्या वेळी शिवसेनेने नाराजी बोलून दाखवली होती, त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने मनसे नाराज झाली आहे. आता ही नाराजी दूर होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.