राजकारणात खळबळ! अजितदादांच्या घराबाहेर कथित जादूटोण्यामागे अशोक खरात? शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा दावा


पुणे : नाशिक येथील तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपांप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.दरम्यान, अजित पवार यांच्या घराबाहेर झालेल्या कथित जादूटोण्याच्या घटनेचा संबंध अशोक खरात याच्याशी जोडला जात असल्याची चर्चा सुरू आहे.

अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर कथित जादूटोणा करण्यात आल्याचा आरोप यापूर्वी करण्यात आला होता. या प्रकरणामागे नाशिकमधील आरोपी अशोक खरात याचा हात असू शकतो, अशी शंका सध्या व्यक्त केली जात आहे.

अजित पवार हे कधीही अंगठ्या किंवा अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवणारे नव्हते. मात्र, त्यांच्याच पक्षातील काही लोकांनी त्यांच्यावर प्रभाव टाकण्यासाठी विविध प्रयत्न केले, असा दावा सुनील माने यांनी केला आहे.

तसेच, अजित पवार यांच्या घराबाहेर झालेला कथित जादूटोणा आणि काळी जादू ही त्यांच्या स्वतःच्या पक्षातील काही लोकांनीच केल्याचा खळबळजनक आरोपही सुनील माने यांनी केला आहे.

महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा लागू करण्यात आला असून, या प्रकरणात एसआयटीनेही कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. सुनील माने यांनी यासंदर्भात भाष्य करताना, अजित पवार यांच्या जवळच्या काही नेत्यांनीच असा प्रकार केल्याचा आरोप केला आहे.

अजित पवार यांच्या घरासमोर कथित जादूटोणा करण्यात आला होता, तसेच काही संशयास्पद वस्तूही ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात नाशिक येथील आरोपी अशोक खरात याचाही सहभाग असल्याचा दावा माने यांनी केला आहे.

राज्यात जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी या नाशिक प्रकरणात स्वतः लक्ष घालावे, अशीही मागणी सुनील माने यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!