हकालपट्टी केलेल्या सुरज चव्हाणांचे पुन्हा राजकीय पुनर्वसन ; राष्ट्रवादीत वादाची ठिणगी..


पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वीच छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना सूरज चव्हाण यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणानंतर सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. मात्र, अवघ्या एका महिन्याच्या आतच त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले असून, त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील मोठा गट नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे पुन्हा एकदा महायुती ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी सुरज चव्हाण यांची नियुक्ती ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंत्री छगन भुजबळ, आमदार आदिती तटकरे, नवाब मलिक आणि समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत करण्यात आली. मात्र या नंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील मोठा गट नाराज असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर अजित पवार यांना मानणाऱ्या गटाची नाराजी असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान लातूरमधील छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयसिंह घाडगे यांना मारहाणीच्या घटनेनंतर सूरज चव्हाण यांना इतक्या लवकर पदस्थापना दिल्यावरून पक्षातल्या दुसऱ्या गटांत नाराजीचा सूर पसरला आहे.सूरज चव्हाण यांना सरचिटणीस करण्याच्या निर्णयाचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मराठवाड्यात पक्षाला फटका बसण्याची नाराज गटाला भीती आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अनेक निर्णयांमध्ये विश्वासात घेत नसल्याने पक्षातील अनेक नेते नाराज असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!