पुण्यातील राजकीय समीकरणे बदलणार ; महापालिका प्रभाग रचनेत बदल निश्चित,तीन माजी नगरसेवकांना घरचा रस्ता?


पुणे : आगामी काळात होणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्या. मात्र ही प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर महापालिका तसेच राज्य सरकारवर नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला जात आहे या पार्श्वभूमीवरच आता महापालिकेची अंतिम प्रभाग रचना दोन दिवसांत प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. यामध्ये आंबेगाव-कात्रज या पाच सदस्यीय प्रभागात मोठे फेरबदल झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुण्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

धनकवडी परिसरातील एका बड्या नेत्याच्या आग्रहाखातर आंबेगाव-कात्रज प्रभागाला बालाजीनगरचा परिसर हरकतीनंतर जोडल्यामुळे दक्षिण पुण्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच इतर काही प्रभागांची नावे बदलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.प्रभाग क्रमांक ३८ हा एकमेव पाच सदस्यीय प्रभाग आहे. या प्रभागातून आगामी निवडणूक लढविण्यासाठी जवळपास आठ माजी नगरसेवक उत्सुक आहेत. येथील जुन्या प्रभागातून निवडून आलेला एक मातब्बर नेता यापूर्वी अप्पर सुपर-इंदिरानगर या प्रभागातून लढण्यास इच्छुक होता. मात्र येथील निवडणूक अडचणीची होण्याचे संकेत मिळाल्यामुळे या नेत्याने त्याचा पारंपरिक प्रभाव असलेला बालाजीनगरचा परिसर ‘प्रभाग क्रमांक ३८’मध्ये आणण्यासाठी हालचाली केल्या आहेत. या नेत्याच्या मर्जीप्रमाणे प्रभाग झाला असल्यास येथून किमान तीन माजी नगरसेवकांना घरचा रस्ता धरावा लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आगामी काळात निवडणुकीसाठीच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती आणि सुनावणी झाल्यानंतर त्यामध्ये 14 ते 15 बदल करण्यात आले असून सहा ते सात प्रभागाच्या नावामध्ये बदल तर आठ ते दहा बदल हळदीचे करण्यात येणार आहेत अशी माहिती समोर आले आहे. त्यामुळे प्रभागांमध्ये खरंच बदल होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!