पुण्यात राजकीय भूकंप ; अजित पवार गटातील १० नेते भाजपच्या गळाला?


पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवले जात आहे. वरिष्ठ नेत्यांपासून माजी नगरसेवकांपर्यंत सर्वांना पक्षात सामील करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. असंच पुण्यातील राजकारण फिरणार असून भाजप पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी अजित पवार गटातील जवळपास १० माजी नगरसेवकांना गळाला लावण्याच्या तयारीत आहे. जवळपास १० माजी नगरसेवकांसोबत चर्चा केली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अजित पवारांना ऐन निवडणुकीत मोठा धक्का बसणार आहे.

महायुतीतील भाजप, अजित पवार गट आणि शिंदेंची शिवसेना हे मित्र पक्षातील नेत्यांना आणि प्रमुखांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचं दिसून येत आहे. यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडला असल्याचं बोललं जात आहे. अशातच पुण्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही नेत्यांनी भाजप पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. यामुळे राजकीय वातावरण अधिक तापलं आहे.भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितलं की, महापालिकेत भाजपच्या विजयासाठी प्रयत्न सुरू आहेत. सक्षम उमेदवार उभे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटातील १० हून अधिक माजी नगरसेवकांसोबत चर्चा सुरू आहे. त्यांना भाजप पक्षात येण्याची इच्छा दर्शवली’, असं काटे म्हणाले. त्यामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. माहितीतील पक्षांतरावर दिल्लीत त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आपली नाराजी उघडपणे दिल्ली दरबारी मांडली. भाजपचा बडा नेता शिवसेनेतील नेते फोडत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. तसेच आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना तसे आदेशही दिले. त्यामुळे महायुतीतील पक्षांतर थांबणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!