महाराष्ट्रात राजकीय भूकंप? आता एकनाथ शिंदेंना संपवून…, काँग्रेस नेत्याचं सर्वात मोठं वक्तव्य

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. शिंदेंच्याविरोधात भाजप उदय सामंत यांना वापरत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

एकनाथ शिंदे यांचा नाराजी दाखवून काही पदरात मिळेल, हा प्रयत्न सुरू आहे. शिंदे यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.
शिंदे यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार म्हणाले की, आता शिंदेंना संपवून एक नवीन उदय होईल, जो महाराष्ट्रात एक नवीन राजकीय दिशा देईल. वडेट्टीवारांनी शिंदे यांच्या स्थितीवर बोलताना ते असेही सांगितले की, आजच्या राजकारणात शिंदे साहेबांची स्थिती बिकट आहे. ते दोन्ही दगडावर हात मारून आहेत.

वडेट्टीवार यांनी महायुतीतील संघर्षावर लक्ष वेधून घेत, सरकारच्या अंतर्गत भांडणाचा इशारा दिला. “सत्तेसाठी, खुर्चीसाठी संघर्ष सुरु आहे. मंत्री आणि पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून भांडणं होत आहेत. शिंदे यांचे नाराजी व्यक्त करणं हे त्याच संघर्षाचे परिणाम आहे, असं वडेट्टीवार म्हणाले. त्याचवेळी, पंकजा मुंडे यांच्या दु:खावरही त्यांनी भाष्य केलं आणि भाजपच्या ओबीसी नेत्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, वडेट्टीवार यांनी सूचित केलं की, शिवसेनेतील तिसऱ्या उदयाची शक्यता नाकारता येत नाही.” त्यामुळे महाराष्ट्रात आगामी राजकीय घडामोडींत मोठे बदल होऊ शकतात, असंही त्यांनी म्हंटले आहे.