दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे यांनी घेतली अमित शहा यांची भेट, महत्वाचे कारण आले समोर…

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसापासून नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. एकनाथ शिंदे गेल्या महिनाभरात तिसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे दिल्ल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी घडत असल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे. शिवसेनेच्या सर्व खासदारांसोबत मी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत शिंदे म्हणाले, ही सदिच्छा भेट होती. खासदारांचे काही विषय होते, ते या भेटीदरम्याान मी मांडले. मागच्या आठवड्यात देखील मी आलो होतो. त्यावेळी मी अमित शाह यांना भेटलो नव्हतो. त्यामुळे सर्व खासदारासोबत त्यांची सदिच्छा भेट घेतली. संसद भवनात मी शाह यांची जाहीरपणे भेटत घेतली आहे. मी लपून छपून काही काम करत नाही. मी जे करतो ते सगळ्यांच्या समोर करतो, असेही ते म्हणाले.
तसेच खासदारांसोबत भेटत जे काही विकासात्मक प्रकल्प आहेत, केंद्र आणि राज्य सरकाराचे मिळून प्रकल्प सुरू आहेत, अशा प्रकल्पांसंदर्भात देखील या भेटीमध्ये चर्चा झाली. या भेटीवेळी दोघांमध्ये राज्यातील राजकारणाविषयी अर्धा तास चर्चा झाली असल्याचे समजते. संसद भवन कार्यालयात त्यांनी ही भेट घेतली.
दरम्यान, रात्री एकनाथ शिंदे दिल्लीत आले होते. त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर आपल्या या दिल्ली दौऱ्यामध्ये त्यांच्या काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत भेटीगाठी सुरू आहेत. तसेच आज उद्धव ठाकरे देखील दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. यामुळे दिल्लीत राजकीय चर्चा सुरु झाली असून ठाकरे संपूर्ण कुटुंब दिल्ली दौऱ्यावर आहे.
काहीवेळातच एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहेत. त्यामुळे सर्वांचे त्या भेटीकडे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसापासून नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. ते महिनाभरात तिसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.