ऐन निवडणुकीत राजकीय संघर्ष पेटला! काँग्रेस उमेदवाराचं कार्यालय जाळलं, भाजपवर गंभीर आरोप

नागपूर : राज्यभरातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान पार पडत आहे. आज सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या आहेत. अशातच आता नागपूरमध्ये मात्र मतदानाच्या आदल्या रात्री काँग्रेस उमेदवाराचे प्रचार कार्यालय जाळल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे.

मतदानाच्या रणधुमाळीतच नागपुरमधील भाजपचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर काँग्रेस उमेदवाराच्या पतीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण चर्चेत असतानाच आता
नागपुमध्ये प्रभाग 31 मधील काँग्रेस उमेदवार शिवानी चौधरी यांचे कार्यालय जाळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे..भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेस उमेदवाराचे प्रचार कार्यालय जाळण्याचा आरोप करण्यात आला आहे.


राज्यातील महापालिकांच्या निवडणूक प्रक्रिया पार पाडल्यानंतर उद्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सर्वच पक्षातील उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत कैद होणार असून उद्या जनतेचा कौल कोणाच्या बाजूने लागणार हे उद्या समजणार आहे.
