आपल्यावर दाखल झालेले सर्व गुन्हे राजकारणाशी प्रेरीत ; आपलं अस्तित्व आगामी काळात दाखवू – मंगलदास बांदल यांची तुरुंगातून परतल्यानंतर भूमिका…!
शिक्रापूर : कोणी कितीही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तरी आपण राजकारणात राहणार असून आगामी निवडणुका लढविणार असून रडायचं नाही तर लढायचं अस सांगत आगामी काळातील निवडणुका लढविण्याचे सुतोवाच जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी स्पष्ट केले आहे.
मागील काही महिने तुरुंगात असलेले बांदल नुकतेच जामिनावर बाहेर आले आहेत. त्यांनी आज शिरूर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सरपंच, बाजार समिती सभापती, पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समिती सभापती ते एकदा विधानसभेची निवडणूक लढविली . लोकांनी व कार्यकर्त्यांनी आपल्यावर भरभरून प्रेम केल्याचे त्यांनी सांगतिले. आपण तालमीत तयार झालेले पैलवान असून कोणी किती ही त्रास दिल्या तरी राजकारणात राहणार असल्याचे सांगत आपल्यावर झालेली कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप त्यांनी केला.
त्याच बरोबर करागुहात असताना आपण विविध पुस्तकाचे वाचन केले व नियमित व्यायाम केल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की मी कायदाचे शिक्षण घेत असून लवकरच वकील बनणार असून जनतेचा हितासाठी उभा राहणार आहे. २० महिन्याहून अधिक काळ तुरुंगात काढला . मी तुरुंगातून बाहेर येवू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयन्त करण्यात आले. बांदल यापुढे आता काही करू शकणार नाही असे काहीना वाटत होते. परंतु आगामी काळात जनतेसाठी संघर्ष करण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
यापुढील तालुक्यातील सर्व निवडणुका लढविणार असून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता कोणत्याही परिस्थितीत न थांबता संघर्ष करायचा असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
कोणत्या राजकीय पक्षाचा झेंडा हाती घेणार याबद्दल बांदल यांना विचारले असता त्यांनी तूर्तास आपण याबद्दल काही भाष्य करणार नसल्याचे सांगून योग्य वेळी ते जाहीर करू असे सांगत कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणारच असा निर्धार व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉग्रेस ने आपल्याला पक्षातून काढून टाकल्याचे त्यांनी एका प्रश्नाचा उत्तरात सांगितले.
दरम्यान माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या निधनानंतर शिरूर तालुक्याचे राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकतर्फी वाटचाल सुरु होती. बांदल यांच्या एन्ट्री ने यापुढे तालुक्यातील विविध निवडणुका अधिक रंगदार होतील असे बोलले जात असून बांदल यांच्या सूटके नंतर अनेक जणांनी भेटी साठी त्याच्या घरी धाव घेतली होती.