पुण्यात राजकीय वातावरण तापलं! अजित पवार गटाच्या नेत्याकडून शिवसैनिकांवर जीवघेणा हल्ला, जोरदार कारची धडक देत डोक्यावर…

पुणे: राज्यात महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षामध्ये दावे-प्रतिदावे होत असतानाच पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्याने शिवसैनिकांवर जीवघेणा हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात शिवसैनिक गंभीर जखमी झाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते उल्हास तुपे यांनी हा हल्ला केला आहे शिवसेनेचे हडपसरचे उपसंघटक दीपक कुलाळ यांच्या अंगावर आधी स्कॉर्पिओ कार घातली त्यानंतर त्यांच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.


हा आला इतका भयानक होता की, चाळीस-पन्नास गुंडांची टोळी घेऊन अजित पवार गटाच्या नेत्याने या दोन ते तीन शिवसैनिकांवर हल्ला केला. त्यात शिवसेनेचे पुणे शहर उपसंघटक दीपक कुलाळ गंभीर जखमी झाले आहेत.याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी नेते उल्हास तुपे यांनी दगडफेक केली आणि मुलानी शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप दीपक कुलाल यांनी केला आहे.
या हल्ल्यामागचे कारण राजकीय असल्याची चर्चा हडपसरमध्ये सुरू आहे.या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
