मुंबईत राजकीय हालचालींना वेग; मनसे नेते अमित ठाकरे आशिष शेलारांच्या भेटीला, कारण काय?

मुंबई : महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना मुंबईत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.मनसे नेते अमित ठाकरे आज सकाळी मंत्री आशिष शेलार यांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत दोघांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप आडून स्वबळाचा नारा देत असल्याची चर्चा होत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी एकत्र लढण्याबाबत सध्या कोणतीही चर्चा नाही म्हणत आहे. तर तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येण्याचे संकेत दिले जात आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अमित ठाकरे यांनी भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार यांची भेट घेतली आहे. या दोघांच्या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. गणेशोत्सव सुरू होत आहे त्यामुळे त्याचं निमंत्रण देण्यासाठी ही भेट आहे का? की आणकी काही कारण आहे याबाबत चर्चां राजकीय वर्तुळा रंगल्या आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी भेट झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवसस्थानी ही भेट झाली होती. 50 मिनिटं दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली होती. त्या चर्चेनंतर बेस्ट निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर ही भेट महत्त्वाची मानली जात होती
