बारामतीत राजकीय हालचालींना वेग; सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसचा दमदार डाव, नेमकं काय ठरलं बैठकीत?


बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध पक्षांकडून बैठका आणि रणनीती आखण्याचा सपाटा सुरू झाला आहे.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षने या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही तयारी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, काँग्रेसनेही या निवडणुकीसाठी चाचपणी सुरू केली असून अलीकडेच पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनुसार, पक्षाकडून आदेश मिळाल्यास सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसकडून तगडा उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली असून २३ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानेही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

दिवंगत अजित पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी काँग्रेसकडून चाचपणी सुरू असून, जर शरद पवार गटाने निवडणूक लढवली नाही, तर वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशानुसार काँग्रेस मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुणे जिल्हा काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीसाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठवण्यात आला आहे. पुण्यातील काँग्रेस भवन येथे झालेल्या बैठकीत, वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशानुसार ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, शरद पवार यांच्या गटाने पोटनिवडणूक न लढवण्याची भूमिका जाहीर केल्याने काँग्रेसकडून या निवडणुकीसाठी हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. त्यांनी म्हटलं की, या पोटनिवडणुकीत शरद पवार गटाने आपली भूमिका स्पष्ट करावी. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)कडून लढवली गेली होती. जर त्यांनी यावेळी निवडणूक लढवली नाही, तर काँग्रेसकडे पुढील निर्णयासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतील, असा दावा त्यांनी केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!