पिंपरी -चिंचवडला पुररेषेतील अनधिकृत बांधकामे काढून टाकणार ! पोलिस संरक्षणासाठी यंत्रणा पुरविणार ….


पिंपरी : शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पात्रालगत असलेल्या निळ्या पुररेषेतील बांधकामांचे येत्या आठ दिवसात क्षेत्रीय कार्यालयनिहाय सर्वेक्षण करून बांधकामे पाडली जाणार आहेत. यासाठी आवश्यक असणारी सर्व सुरक्षा यंत्रणा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय उपलब्ध करून देईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पालिका प्रशासनाला दिले.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात नदीलगतच्या भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. त्याअनुषंगाने जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी पवना, मुळा, इंद्रायणी नदीपात्रात शहरातील निळ्या पुररेषेमध्ये असणारी बांधकामे पाडण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय चिंचवड येथे नियोजन बैठक पार पडली.

या बैठकीस पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम, महापालिका उप आयुक्त मनोज लोणकर, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त संदिप डोईफोडे तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या धरण क्षेत्रासह शहरी भागात होणारा पाऊस तसेच धरणांमधून होणाऱ्या विसर्गामुळे या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असते. त्यामुळे अनेकवेळा शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. त्यादृष्टीने कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी आवश्यक खबरदारीसह विविध उपाययोजना करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!