पुण्यात पुन्हा एकदा पोलीस उपनिरीक्षकाची दादागिरी ; थेट चालकाला शिवीगाळ अन जीवे मारण्याची धमकी…

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलिसांची दादागिरी पाहायला मिळत असतानाच आता पुन्हा एकदा पुणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने थेट मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.आरोप संबंधित पोलिस उपनिरीक्षकासोबत असलेल्या मित्राने मेडिकल चालकाच्या विरोधात तक्रार दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विजय सरवार असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते चंदननगर पोलीस स्टेशन येथे परिविक्षाधीन (प्रोबेशनल) पोलीस उपनिरीक्षक म्हणून नेमणुकीस आहेत.विश्रामबाग पोलिस ठाण्यात याबाबत मेडिकल चालक महादेव चौरे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजण्याचा सुमारास नारायणन पेठेतील मातोश्री मेडिकल येथे फिर्यादी महादेव चौरे हे मेडिकलमध्ये झाडू मारत होते. यावेळी त्यांच्या दुकानासमोर पोलिस उपनिरीक्षक विजय सरवार जर त्यांच्या मित्रांसोबत थांबले होते. यावेळी मेडिकल चालकाने बाजूला होण्यास सांगितले यातून त्यांच्यात वाद झाला. या वादात पोलिस उपनिरीक्षक विजय सरवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या हनुमंत रायकर यांनी फिर्यादी व्यक्तीला मारहाण करत शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. त्याबाबत तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या बाजूला याच प्रकरणात सुमित रायकर यांनी देखील महादेव चौरे यांनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली आहे. यावरून आता विश्रामबाग पोलिस ठाण्यात या प्रकरणी दोन्ही बाजूकडून एकमेकांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे
