Police Recruitment : तरुणांनो लागा कामाला! राज्यात होणार १६ हजार जागांवर पोलीस भरती…


Police Recruitment : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण राज्यात तब्बल १६ हजार जागांवर पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.

“राज्यात २०२२, २०२३ मध्ये रिक्त झालेली १०० टक्के पदे भरण्यासाठी निर्बंध मागे घेतले असल्याने येणाऱ्या काळात पोलिसांच्या तब्बल १७ हजार ४७१ जागांवर भरती होणार आहे.

ही भरती १० टक्के मराठा आरक्षणासह होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिली आहे. विधान परिषद नियम २५९ आणि २६० अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना फडणवीस बोलत होते.

गेल्या दोन वर्षांतील तुलना केली तर २०२३ मध्ये ७७ गुन्हे कमी आहेत. राज्यात सध्या ५० सायबर पोलिस ठाणी आणि ५१ सायबर प्रयोगशाळा सुरू आहेत. नवीन राज्यस्तरीय सायबर केंद्र लवकरच सुरू केले जाईल. यासाठी ८०० कोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. Police Recruitment

त्याशिवाय २० गस्ती नौका खरेदी करण्यासाठी ११७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पोलिसांना समुद्रात पोहण्याचे अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!