Police Recruitment : पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरू, पुणे शहर आणि ग्रामीणसाठी होणार नेमणूक जाणून घ्या…


Police Recruitment पुणे शहर पोलिस आयुक्तालय, पुणे ग्रामीण पोलिस, पुणे लोहमार्ग पोलिस आणि कारागृह पोलिस शिपाई भरती प्रक्रियेस सुरवात झाली आहे. यामध्ये पुणे पोलिस आयुक्तालयाअंतर्गत शिपाई चालक संवर्गातील २०३ जागा, ग्रामीण पोलिस दलात पोलिस शिपाई पदासाठी ५१३ जागा, कारागृह विभागात कारागृह शिपाई पदासाठी ५१३ जागा आणि लोहमार्ग पोलिसांत ६८ जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

पुणे पोलिस आयुक्तालयाअंतर्गत पोलिस शिपाई चालक संवर्गातील २०२ पदे भरण्यात येणार आहेत. याची भरती प्रक्रिया १९ जूनपासून शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात होणार आहे. यासाठी जानेवारी २०२४ मध्ये अर्ज भरून घेण्यात आले होते.

शिपाई चालक संवर्गासाठी २०२ जागा असून त्यासाठी २० हजार ३८२ अर्ज आले आहेत. यामधील ईएसईबीसी संवर्गाअंतर्गत नव्याने लागू झालेले मराठा आरक्षण दहा टक्के असणार असल्याची माहिती अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) अरविंद चावरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी उपायुक्त रोहिदास पवार उपस्थित होते. Police Recruitment

भरतीसाठी कोणाच्याही प्रलोभनाला बळी पडू नये. भरती करून देण्याचे कोणी आमिष दाखवत असेल तर दक्षता अधिकारी हिम्मत जाधव (उपायुक्त विशेष शाखा) यांच्या 8975283100 या क्रमांकावर संपर्क साधावा. ही प्रक्रिया १२ जुलै २०२४ पर्यंत चालणार आहे. 28 जून ते 03 जुलै या दिवशी पुणे शहरात पालखी बंदोबस्त असल्याने त्या दिवशी भरती प्रक्रिया घेण्यात येणार नाही.

आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर…

पुणे ग्रामीण पोलिस दलातील पोलिस शिपाई यांची 448 व चालक पोलिस शिपाई यांची 48 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पोलिस शिपाई चालक या पदासाठी मैदानी चाचणी परीक्षा 19 जून ते 28 जून या कालावधीत घेण्यात येणार आहे.

पोलिस शिपाई भरती प्रक्रियेमध्ये मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी आरएफआयडी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, त्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी परीक्षा ही पारदर्शक व अचूक निर्णय होण्यासाठी मदत होणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

कारागृह शिपाईपदासाठी ट्रान्सजेंडरचे अर्ज..

कारागृह पश्चिम विभागासाठी कारागृह पोलिस शिपाई पदासाठी 513 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी 1 लाख 10 हजार 488 अर्ज आले आहेत. या पदांसाठी पाच ट्रान्सजेंडर व्यक्तींचे अर्ज आले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पुणे पोलिसांची शिपाई चालक संवर्गातील भरती प्रक्रिया झाल्यानंतर राबविण्यात येणार आहे.

राज्य राखीव दलाच्या ३६२ पदांसाठी भरती..

राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 2 पुणे येथील रिक्त असणार्‍या 362 शसस्त्र पोलिस शिपाईपदांसाठी भरती प्रक्रिया (दि. 19 जून) सुरू करण्यात येणार आहे. ही भरती बल गट क्रमांक 2 च्या मैदानावर सुरू होणार आहे. बुधवारी पहाटे पाच वाजता कागदपत्रांसह अलंकारण हॉल येथील प्रवेशद्वाराजवळ उपस्थित राहावे, अशी माहिती समादेशक नम्रता पाटील यांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!