मोठी बातमी! राज्यात ११,००० पदांसाठी पोलीस भरती होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा…


मुंबई : विधान भवनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरतीविषयी मोठी घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ११,००० पदांसाठी पोलीस भरती होणार असल्याची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात ११ हजार जागांसाठी पोलीस भरती केली जाणार आहे. पोलीस भरतीच्या मान्यतेकरीता गृह विभागाला प्रस्ताव देण्यात आला होता.

या प्रस्तावाला मान्यता मिळाला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये भरतीला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे आता पोलीस दलात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

या प्रस्तावावर ३० सदस्यांनी मत व्यक्त केले आहे. यावर विविध प्रकारच्या सूचना देण्यात आल्या. काहींना प्रस्तावावर टीका देखील केली. मागील ३ वर्षात ३८ हजार ८०२ जागांसाठी पोलीस भरती झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात सांगितले. पोलीस भरती प्रक्रियेत सुरुवातीला मैदानी चाचणी आणि त्यानंतर मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाईल.

       

असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच या भरतीमध्ये बँड समन, चालक शिपाई, पोलिस शिपाई तसेच राज्य राखीव पोलिस बलातील अंमलदार पदांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. उमेदवारांना एका पदासाठी फक्त एकाच जिल्ह्यात अर्ज करता येणार आहे. थोडक्यात तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात, त्याच जिल्ह्यातून अर्ज भरता येईल. असेही ते म्हणाले.

दरम्यान, पोलीस भरतीच्या मान्यतेकरीता गृह विभागाला प्रस्ताव देण्यात आला होता. यामुळे आता तरुणांना हा एक नोकरीचा चांगला पर्याय उपलब्ध झाला असून अनेक दिवसांपासून तरुण याबाबत तयारी करत आहेत. यामुळे आता त्यांना दिला मिळाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!