कुंजीरवाडी व लोणी काळभोर येथील हातभट्टी धंद्यांवर पोलिसांचे छापे, चार महिलांना ठोकल्या बेड्या..

लोणी काळभोर : कुंजीरवाडी व लोणी काळभोर येथील हातभट्टी विक्रीच्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी एकाच दिवशी छापे टाकले आहेत. या छाप्यात पोलिसांनी ४ महिलांना बेड्या ठोकल्याची माहिती आहे. तसेच त्यांच्याकडून सुमारे १३ हजार रुपये किंमतीची १२६ लिटर दारू जप्त केली आहे.

ही कामगिरी लोणी काळभोर पोलिसांनी गुरुवारी (ता.१८) एकाच दिवशी केली आहे. अलका भगवान खलसे (वय ५५, रा. खलसेवस्ती कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे), कौशल्या कैलास राखपसरे (वय.६०,) द्रौपदाराजेंद्र उपाध्याय (वय.३५) निशा कृष्णा उपाध्याय (वय. ३२, तिघेही रा. गारुडी गल्ली, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.

सविस्तर माहिती अशी की, वरील चारही महिला बेकायदा हातभट्टी दारू बाळगून विक्री करीत आहेत. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर व त्यांच्या सहकाऱ्यांचे पथक तयार केले. पथकाने एकाच दिवशी चार वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून महिलांना अटक केली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र प्रोव्हिबिशन अॅक्ट कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी, योगेश पैठणे, पोलीस हवालदार सर्जेराव दडस, तेजस जगदाळे राहुल कर्डिले, सचिन भिमराव सोनवणे, निकीता पोळ तसेच गुन्हे शाखा युनिट-६चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, बाळासाहेब सकाटे, सुहास तांबेकर, पोलिस अंमलदार शेखर काटे व त्यांच्या पथकाने केली आहे.
