वाल्मीक कराडच्या कट्टर समर्थकाला पोलिसांचा दिलासा ; गोट्या गित्तेसह साथीदारावरील मकोका हटवला…


पुणे : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यातील गुन्हेगारी चांगलीचं चर्चेत आली आहे. परळी तालुक्यातील सहदेव सातभाई यांच्यावर झालेल्या खुनाचा प्रयत्न आणि लुटीचा प्रकरणात बीड पोलिसांनी मोठी कारवाई करत वाल्मीक कराड समर्थक रघुनाथ फड गॅंगवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमक अंतर्गत कारवाई केली होती. आता या प्रकरणात एकूण सात जणांना आरोपी करण्यात आले होते. आता या खटल्याला नव वळण मिळाले असून वाल्मीक कराडचा राईट हॅन्ड असलेल्या गोट्या गीते याच्यासह साथीदारांवरील मकोका रद्द केला आहे.

वाल्मिक कराडचा राईट हँड म्हणून ओळख असलेला आणि मागील काही महिन्यांपासून फरार असलेला गोट्या गित्ते यांच्यावरीलही मकोका काढण्यात आला. त्याच्यासोबतच संदीप सोनवणे, जगन्नाथ फड, विलास गित्ते आणि बालाजी गित्ते या पाच जणांवरील मकोका रद्द करण्यात आला. मात्र, पोलिसांनी अजून दोन जणांवरील मकोका रद्द केला नाही. यामध्ये टोळीप्रमुख रघुनाथ फड आणि त्याचा सहकारी धनराज उर्फ राजाभाऊ फड याच्यावरील मकोका मात्र कायम ठेवण्यात आला आहे. या दोघांविरूद्धही संघटित गुन्हेगारीचा विस्तृत इतिहास असल्याचे पोलिसांनी आधी स्पष्ट केला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच गोट्या गित्ते याने रेल्वे पटरीवर बसून एक व्हिडीओ तयार केला होता. त्याने म्हटले होते की, आम्हाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. वाल्मिक कराडवर खोटे आरोप केले जात आहेत. यादरम्यान त्याने जितेंद्र आव्हाड यांच्यावरही आरोप केली होते.रघुनाथ फड टोळीवर सहदेव सातभाई यांच्या खुनाच्या प्रयत्नाचा आरोप होता. मात्र, या प्रकरणाला वेगळे वळण लागल्यानंतर या टोळीतील पाच जणांवरील मकोका काढला आहे

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!