नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडमध्ये ; कल्याण डोंबिवलीत ‘ हे ‘रस्ते राहणार बंद? पर्यायी मार्ग कोणते?


मुंबई : नवरात्रौत्सव आणि दसरा मुंबईसह पुण्यामध्ये मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या नवरात्र उत्सव काळात कल्याणमधील प्रसिद्ध दुर्गामाता मंदिर आणि दुर्गाडी किल्ल्यावर दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. याच कारणामुळे शहरात मोठी गर्दी होते. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. ही संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांना सुलभ प्रवास करता यावा म्हणून वाहतूक पोलिसांनी काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत.

ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी काढलेल्या आदेशानुसार, २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत काही मुख्य मार्गांवरून जड, अवजड आणि मल्टिएक्सल वाहनांच्या वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जाणून घ्या कोणते रस्ते बंद आणि पर्यायी मार्ग..

कोणकोणते रस्ते बंद?

१. कल्याण नाका ते मुद्रा बायपास: नवी मुंबई, पनवेल, महापे पाईपलाईन आणि मुद्रा बायपास मार्गे कल्याण शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व जड आणि अवजड वाहनांना बंदी करण्यात आला आहे. या वाहनांनी मुद्रा बायपासवरून खारेगाव टोलनाका आणि मुंबई-नाशिक महामार्गाचा वापर करावा.

२. खोणी निसर्ग ढाबा: तळोजा बायपासमार्गे कल्याण शहराकडे येणाऱ्या जड वाहनांना प्रवेश नाही. ही वाहने बदलापूर – अंबरनाथ – काटई बदलापूर चौक – लोढा पलावा – कल्याण फाटा या पर्यायी मार्गाचा वापर करू शकतात.

३. श्रीराम चौक: श्रीराम चौकातून कोळसेवाडी हद्दीत जाणाऱ्या जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहनांनी उल्हासनगर – शहाड – अंबरनाथ मार्गाने प्रवास करावा.

४. आधारवाडी चौक: शहाड, दुर्गामाता चौक, कोनगाव मार्गे भिवंडीकडे जाणाऱ्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही वाहने आधारवाडी चौक – गंधारी ब्रिज – बापगाव – सोनाळे या पर्यायी मार्गाचा वापर करू शकतात.

५. रांजनोली नाका: कोनगाव मार्गे कल्याण शहरात येणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.

६. नेवाळी नाका: मलग रोड आणि चक्कीनाका मार्गे कल्याण शहराकडे येणाऱ्या जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहनांसाठी बदलापूर – अंबरनाथ हायवे हा पर्यायी मार्ग खुला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!