इंदापूर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार बेपत्ता! पोलिस निरीक्षकासह दोन कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप..


इंदापूर : पुणे ग्रामीण पोलीस दलात एक खळबळजनक घटना घडली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी पोलीस हवालदार विष्णू केम दारणे हे १० जूनला सकाळी पहाटेपासूनच इंदापूर पोलीस ठाण्याच्या शासकीय वसाहतीतून बेपत्ता झाले आहेत.

केम दारणे हे बेपत्ता कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याबाबत त्यांनी लिहिलेली एक चिठ्ठी समोर आली असून, या चिठ्ठीतून त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

मागील दोन महिन्यांपूर्वी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलीस हवालदार रासकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तुझी नोकरी व यापुढील आयुष्य हे उध्वस्त करून टाकेल, अशी भाषा वापरून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, असं या चिठ्ठीत लिहिलेल आहे.

विष्णू केमदारणे यांनी त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर एक कॉल रेकॉर्डिंग ऑडिओ देखील पाठवलेला आहे. माझ्या या अवस्थेला होणाऱ्या परिणामांना पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हेच जबाबदार आहेत, असंही या चिठ्ठीमध्ये लिहिण्यात आलं आहे.

या संपूर्ण खळबळजनक घटनेनंतर इंदापूर पोलीस ठाण्यात विष्णू केमदारणे यांच्या पत्नी प्रियंका केमदारणे यांनी आपले पती हरवल्याची तक्रार इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या घटनेमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून, केमदारणे नेमके बेपत्ता का झाले? त्यांच्या बेपत्ता होण्यामागे इतर काही कारणं आहेत का? या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!