पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा अधिकाऱ्यांना थेट इशारा!! अवैध धंदे, गैरप्रकार सहन करणार नाही, गुन्हे झाले तर बदली करावी लागेल…

पुणे : पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस अधिकार्यांना इशारा दिला आहे. पोलीस अधिकार्यांकडून पारदर्शक आणि प्रामाणिक पोलिसिंगची अपेक्षा आहे. त्यांच्या हद्दीत अवैध धंदे सुरु असतील तर ते सहन करणार नाही. रेकॉर्डवरील गुन्हेगार सातत्याने गुन्हे करत असतील तर त्या अधिकार्यांची बदली करावीच लागेल, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.

तसेच जे अधिकारी दिलेले उद्दिष्टे पूर्ण करतील, तेच अधिकारी तेथे राहतील, असेही ते म्हणाले. पोलीस आयुक्तालयातील वार्षिक परिषदेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा इशारा दिला आहे. यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहेत.
तसेच ज्यांच्या हद्दीत अवैध धंदे सुरु असतील. रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून सातत्याने गुन्हे होत असतील, गैरप्रकार होत असतील, अशा अधिकार्यांना बदलावेच लागेल, असा उघड इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच ते म्हणाले, अधिकार्यांकडून पारदर्शक आणि प्रामाणिक पोलिसिंग अपेक्षित आहे. तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होत्या. निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार एखादा पोलीस अधिकारी २ वर्ष त्या जिल्ह्यात असेल तसेच त्याचा होम जिल्हा असेल तर त्याची बदली करावी लागली.
दरम्यान, अधिकारी बदलून गेला की, नव्या आलेल्या अधिकार्याला हद्द व पोलीस ठाण्याचे कामकाज समजून घेण्यास वेळ लागतो. त्यामुळे त्याचा लोकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहे. असेही त्यांनी सांगितले.