उरुळी कांचनला रोमिओंच्या दुचाकींवर पोलिसांची कारवाई! बुलेट, पुगळ्यांवर कारवाई करुन ५८ हजारांचा दंड वसुली…

उरुळीकांचन : उरुळीकांचन पोलिसांनी प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला बेदकारपणे वाहन चालवून रोमिओगिरी काढणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
ट्रीपल सिट वाहन चालणे, वाहन परवाना नसणे व हेल्मेटचा वापर न करण्याच्या नियमांचा भंग करुन वाहन चालविल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिसांनी या कारवाईत एकूण १२ प्रकरणे दाखल केली आहे. तर त्यांच्याकडून ५८,००० दंड वसूल केला आहे. या कारवाईत एकूण पाच बुलेट सामावेश आहे.
ही कारवाई उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या वाहतूक विभागातील भोसले, फड, माने, वाघ, भोसले यांनी कारवाई केली आहे. दरम्यान या कारवाईचे नागरीकांनी स्वागत केले आहे.
Views:
[jp_post_view]