PMGKAY : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशातील ८१ कोटी जनतेसाठी आनंदाची बातमी! मिळणार मोफत रेशन, लाभ ५ वर्षांनी वाढवला….

PMGKAY : एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ८१ कोटी गरीब जनतेसाठी मोफत रेशन योजना ५ वर्षांसाठी वाढवण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळातील बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.

माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी बुधवारी माहिती देत सांगितले की, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना १ जानेवारी २०२४ पासून पुढील पाच वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. PMGKAY
तसेच १ जानेवारी २०२४ पासू डिसेंबर २०२८ पर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ मिळेल. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितले की या योजनेसाठी ११.८ लाख कोटी रुपये खर्च येईल.

दरम्यान, या योजनेचा विस्तार आधी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत करण्यात आला होता. पण आता बैठकीत, पुढील ५ वर्षे ही योजना वाढवण्यात आल्याचे सांगण्यात आले. या योजनेत राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम अंतर्गत प्रति लाभार्थीला प्रत्येक ५ महिन्याला ५ किग्रॅ. मोफत रेशन दिले जाते.