‘२०२४ मध्ये नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील’ :अमित शाह


नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी २०२४ मध्येही सरकार स्थापन करेल आणि नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. ते इंडिया टुडेने आयोजित केलेल्या इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मध्ये बोलत होते.

मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर जम्मू-काश्मीर, ईशान्य भाग आणि माओवाद्यांच्या समस्या या तीन महत्वाच्या बाबींचा मोठ्या प्रमाणात निपटारा करण्यात आला. पाकिस्तानमध्ये भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतरही कोणत्याही परकीय शक्तीने देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याची हिंमत केली नाही, असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

देशाचे पुढचे पंतप्रधान कोण असेल हे जनता ठरवेल. मी देशातील सर्व भागांचा आणि राज्यांचा दौरा केला आहे. त्यावरून मी सांगू शकतो की, पुढील सरकार भाजप बनवेल आणि मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असं अमित शाह म्हणाले.

१९७० नंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. २०१४ मध्ये मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेवर आले, तेव्हा ६० कोटी लोकांकडे बँक खाती नव्हती, १० कोटी लोकांना शौचालये नव्हती आणि तीन कोटी लोकांकडे वीज कनेक्शन नव्हते. मोदी सरकारने या सर्वांना ते मिळवून दिलं. बँका, शौचालये, मोफत अन्न, वीज आणि गॅस कनेक्शन, एवढेच नाही तर भारताबाहेरही जगात कुठली समस्या उद्भवल्यास इतर नेते मोदींकडे आशेने पाहतात. तसेच मोदी सरकारच्या काळात कलम ३७० रद्द करण्यात आले, राम मंदिर बांधले जात आहे आणि तिहेरी तलाकशी संबंधित समस्यांचे निराकरण केले गेल्याचंही अमित शाह यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!